Live Transcribe & Sound Notifications हे फक्त तुमचा Android फोन वापरून, कर्णबधिर आणि श्रवणदोष असणाऱ्या लोकांमध्ये दैनंदिन संभाषणे आणि आसपासचे आवाज अधिक ॲक्सेस करण्यायोग्य करते.
बर्याच डिव्हाइसवर, तुम्ही या पायऱ्या वापरून Live Transcribe & Sound Notifications उघडू शकता:
१. तुमच्या डिव्हाइसचे Settings अॅप उघडा
२. अॅक्सेसिबिलिटी वर टॅप करा
३. तुम्हाला कोणते वैशिष्ट्य वापरायचे आहे यानुसार Live Transcribe किंवा आवाजासंबंधित नोटिफिकेशन वर टॅप करा
तुम्ही Live Transcribe किंवा आवाजासंबंधित नोटिफिकेशन सुरू करण्यासाठी अॅक्सेसिबिलिटी बटण, जेश्चर किंवा क्विक सेटिंग्ज (
https://g.co/a11y/shortcutsFAQ) हे देखील वापरू शकता.
रीअल-टाइम ट्रान्स्क्रिप्शन• १२० हून अधिक भाषा आणि बोलीभाषांमधून रीअल टाइम ट्रान्स्क्रिप्शन मिळवा. नावे किंवा घरगुती वस्तू यांसारखे तुम्ही वारंवार वापरत असलेले कस्टम शब्द जोडा.
• एखाद्याने तुमचे नाव घेतल्यावर व्हायब्रेट होण्यासाठी तुमचे डिव्हाइस सेट करा.
• तुमच्या संभाषणामध्ये प्रतिसाद टाइप करा.
• अधिक चांगल्या ऑडिओ रिसेप्शनसाठी, वायर्ड हेडसेटमध्ये आढळणारा बाह्य मायक्रोफोन, ब्लूटूथ हेडसेट आणि USB माइक वापरा.
• फोल्ड करता येण्यासारख्या फोनवर बाहेरील स्क्रीनवर ट्रान्स्क्रिप्शन आणि तुमचे टाइप केलेले प्रतिसाद दाखवा जेणेकरून इतरांशी संवाद साधणे सोपे होईल.
• ट्रान्स्क्रिप्शन ३ दिवसांसाठी सेव्ह करणे निवडा. सेव्ह केलेली ट्रान्स्क्रिप्शन ही तुमच्या डिव्हाइसवर ३ दिवस राहतील, जेणेकरून तुम्हाला ती कॉपी करून इतर ठिकाणी पेस्ट करता येतील. बाय डीफॉल्ट, ट्रान्स्क्रिप्शन सेव्ह केली जात नाहीत.
आवाजासंबंधित नोटिफिकेशन• धूराच्या अलार्मची बीप वाजणे किंवा बाळाचे रडणे यांसारख्या तुमच्या आसपासच्या महत्त्वाच्या आवाजांबद्दल सूचना मिळवा.
• तुमची उपकरणे बीप होतील, तेव्हा सूचना मिळवण्यासाठी कस्टम आवाज जोडा.
• तुमच्या भोवताली काय घडत होते हे तपासण्यासाठी मागील १२ तासांच्या आवाजाचे पुनरावलोकन करा.
आवश्यकता:• Android 12 आणि त्यावरील आवृत्ती
Live Transcribe & Sound Notifications यूएसमधील गॅलोडेट या कर्णबधीर आणि कमी ऐकू येणार्या लोकांच्या प्रमुख विद्यापीठाच्या सहयोगाने तयार केले गेले आहे.
मदत आणि फीडबॅक• फीडबॅक देण्यासाठी आणि उत्पादन अपडेट मिळवण्यासाठी ॲक्सेस करण्यायोग्य Google ग्रुप
https://g.co/a11y/forumयामध्ये सामील व्हा
• Live Transcribe & Sound Notifications वापरण्याशी संबंधित मदतीसाठी, आमच्याशी
https://g.co/disabilitysupport इथे कनेक्ट करा.
परवानग्या नोटिसमायक्रोफोन: Live Transcribe आणि आवाजासंबंधित नोटिफिकेशन यांना तुमच्या आजूबाजूचे बोलणे ट्रान्स्क्राइब करण्यासाठी मायक्रोफोनचा अॅक्सेस आवश्यक आहे. ट्रान्स्क्रिप्शन किंवा ओळखलेल्या आवाजावर प्रक्रिया केल्यानंतर ऑडिओ स्टोअर केला जात नाही.
नोटिफिकेशन: तुम्हाला आवाजाबाबत सूचित करण्यासाठी आवाजासंबंधित नोटिफिकेशन वैशिष्ट्यांना नोटिफिकेशन अॅक्सेस असणे आवश्यक आहे.
जवळपासची डिव्हाइस: Live Transcribe ला मायक्रोफोनसाठी तुमच्या ब्लूटूथ डिव्हाइसशी कनेक्ट होण्याकरिता जवळपासच्या डिव्हाइसचा अॅक्सेस असणे आवश्यक आहे.