नेमकी ठिकाणे ओळखण्याचा what3words हा एक सोपा मार्ग आहे. प्रत्येक तीन मीटरच्या चौरसाला तीन शब्दांचे एक अद्वितीय संयोजन दिले आहे: हाच आहे what3words पत्ता.
आता तुम्ही फक्त तीन सोप्या शब्दांचा वापर करून अचूक स्थाने शोधू शकता, शेअर करू शकता आणि नॅव्हिगेट करू शकता.
what3words या गोष्टींसाठी वापरा:
- फक्त तीन शब्द वापरून जगात कुठेही तुमचा मार्ग शोधा.
- भेटण्यासाठी अचूक ठिकाणे निवडा.
- लोकांना तुमचा फ्लॅट, व्यवसाय किंवा एअरबीएनबी प्रवेशद्वार शोधण्यात मदत करा.
- तुमच्या पार्किंगच्या ठिकाणी परत जाण्याचा मार्ग शोधा.
- घटना घडल्याचे स्थान असो की डिलिव्हरीसाठीचे प्रवेशद्वार - महत्वाची स्थळे जतन करा.
- तुमची आवडती संस्मरणीय ठिकाणे जतन करा - निसर्गरम्य ठिकाण, प्रपोज केलेली जागा, तुमचे आवडते किराणामालाचे दुकान.
- लोकांना विशिष्ट प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करा.
- आपत्कालीन सेवांना तुम्हाला शोधण्यात मदत करा.
- योग्य पत्त्याशिवाय दुर्गम ठिकाणे शोधा.
what3words चे तीन शब्दी पत्ते तुम्हाला प्रवास मार्गदर्शक पुस्तिका, वेबसाईटची संपर्क पाने, आमंत्रणे, बुकिंग निश्चित झाल्याचे मेसेज अश्या अनेक ठिकाणी सापडतील - जिथे साधारणपणे पत्त्यांशी संबंधित माहिती सापडते अश्या सर्व ठिकाणी. जर तुम्हाला मित्राने घरी बोलवले असेल तर त्याला त्याचा तीन शब्दी पत्ता शेअर करायला सांगा.
लोकप्रिय वैशिष्ट्ये:
- गूगल मॅप्स आणि इतर नॅव्हिगेशन अॅप्ससह सुसंगत
- तुमची आवडती ठिकाणे जतन करा आणि त्यांचे याद्यांमध्ये वर्गीकरण करा
- AutoSuggest मुळे तुम्हाला इंटेलिजेंट सजेशन्स मिळतात
- हिंदी, मराठी आणि तमिळ सारख्या 12 भारतीय भाषांसह 50 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध
- कंपास मोडसह ऑफलाइन नॅव्हिगेट करा
- डार्क मोडला सपोर्ट
- फोटोमध्ये what3words पत्ता जोडा
- Wear OS
तुम्हाला काही समस्या असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास, आम्हाला
[email protected] वर ईमेल करा