Meta द्वारे WhatsApp Business
WhatsApp Business वापरून तुम्हाला WhatsApp वर तुमचे अस्तित्व निर्माण करता येऊ शकते ज्यामुळे तुम्ही तुमच्या ग्राहकांशी अधिक कार्यक्षम पद्धतीने संवाद साधू शकता आणि तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करू शकता.
जर तुमचा व्यवसाय फोन नंबर आणि वैयक्तिक फोन नंबर स्वतंत्र असेल तर तुमच्याकडे WhatsApp Business आणि WhatsApp Messenger हे एकाच फोन वर असू शकते ते फक्त स्वतंत्र फोन नंबर वापरून रजिस्टर केले पाहिजे.
WhatsApp Messenger वरील फीचर्स बरोबरच WhatsApp Business मध्ये पुढील गोष्टी आहेत :
• व्यवसाय प्रोफाइल : तुमच्या व्यवसायासाठी प्रोफाइल तयार करा ज्यामुळे तुमच्या ग्राहकांना तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल — जसे की तुमची वेबसाईट, स्थान किंवा संपर्क माहिती.
• व्यवसाय मेसेजिंग साधने : व्यस्तता संदेश वापरून तुम्ही उपस्थित नसताना देखील तुमच्या ग्राहकांना जास्त जबाबदारीने प्रतिसाद द्या किंवा तुम्हाला जेव्हा एखाद्या ग्राहकाकडून पहिल्यांदाच संदेश येत असेल तेव्हा त्यांना स्वागत संदेश पाठवा.
• लँडलाईन/स्थिर नंबरला सपोर्ट : तुम्ही WhatsApp Business हे लँडलाईन (किंवा स्थिर) फोन नंबर वापरून वापरता येऊ शकते आणि तुमचे ग्राहक तुम्हाला त्यावर संदेश पाठवू शकता. त्यासाठी व्हेरिफिकेशन प्रक्रिया करत असताना "मला कॉल करा" हा पर्याय निवडून तुम्ही कोड प्राप्त करू शकता.
• WHATSAPP BUSINESS आणि WHATSAPP MESSENGER दोन्ही वापरा : तुम्ही एकाच फोनवर WhatsApp Business आणि WhatsApp Messenger वापरू शकता फक्त प्रत्येक ॲप वर स्वतंत्र फोन नंबर वापरून रजिस्टर करणे गरजेचे आहे.
• WHATSAPP वेब : तुम्ही तुमच्या ग्राहकांना ब्राउझरवरून जास्त कार्यक्षमतेने प्रतिसाद देऊ शकता.
WhatsApp Business हे WhatsApp Messenger वरच आधारित आहे आणि त्यामध्ये ते सर्व फीचर्स आहेत ज्यावर तुम्ही विसंबून राहू शकता जसे की, मल्टिमीडिया, मोफत कॉल्स, मोफत आंतरराष्ट्रीय मेसेजिंग*, गट चॅट, ऑफलाईन मेसेजेस, आणि अजून बरेच काही.
*डेटा शुल्क लागू शकते. अधिक माहितीसाठी तुमच्या प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
टीप : एकदा का तुम्ही तुमचा चॅट बॅकअप WhatsApp Messenger वरून WhatsApp Business मध्ये स्थानांतरित केला की तुम्ही तो WhatsApp Messenger मध्ये परत रिस्टोअर करू शकत नाही. जर तुम्हाला तसे करायचे असेल तर आम्ही असे सुचवितो की WhatsApp Business वापरण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फोनवरील WhatsApp Messenger चा बॅकअप तुमच्या कॉम्प्युटरवर घ्या.
---------------------------------------------------------
तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो! तुमच्याकडे कोणताही फीडबॅक, प्रश्न किंवा शंका असल्यास, येथे आम्हाला ई-मेल करा:
[email protected]किंवा twitter वर आम्हाला फॉलो करा :
http://twitter.com/WhatsApp
@WhatsApp
---------------------------------------------------------