Yahoo मेल Go

यामध्‍ये जाहिराती आहेतअ‍ॅपमधील खरेदी
४.६
१६.५ ह परीक्षण
५ लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

कमी साइझच्या नवीन Yahoo Mail Go ॲपविषयी जाणून घेतल्याबद्दल धन्यवाद. Gmail, Microsoft Outlook आणि Yahoo mailboxes सारखी एकापेक्षा जास्त खाती हाताळण्यासाठी Android वरचं हे सर्वोत्तम इमेल ॲप आहे. जर का तुम्हाला सहज-सोपा, स्वतःसाठी खास आणि जरा हटके दिसणारा, अटॅचमेंट्समध्ये वैविध्य असणारा आणि एक हजार जीबी स्टोअरेजची जागा देणारा मेलबॉक्स हवा असेल तर हे ॲप तुमच्यासाठीच आहे. चला तर मग, तुमचे Yahoo, Gmail आणि Microsoft Outlook चे मेलबॉक्स एका छताखाली आणण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Yahoo Mail Go ॲप

आवडती वैशिष्ट्ये:

कोणताही इमेल ॲड्रेस वापरा
तुमच्या कुठल्याही खात्याला दुय्यम न ठरवता Outlook आणि Gmail सारख्या खात्यांना एकत्र एका जागी आणा. प्रत्येकासाठी वेगळी सेटिंग्ज, रंग आणि नोटिफिकेशन्स वापरून ती खाती एकमेकांपासून वेगळीही ठेवा. त्यामुळे जर तुम्ही कामासाठी Outlook, घरासाठी Yahoo आणि इतर कामांसाठी Gmail वापरत असाल तर आमचे ॲप या साऱ्यांना एकत्र गुण्यागोविंदाने नांदवते.

अनसबस्क्राइब
तुम्हाला येणारे स्पॅम आणि नको असणारे मेल बिनधास्त अनसबस्क्राइब करा. Yahoo Mail तुम्हाला तुम्ही सबस्क्राइब केलेल्या इमेल्सची यादी एकाच स्क्रीनवर दाखवतो. त्यामुळे एका टॅपवर अनसबस्क्राइब करणे सोपे होते.

अटॅचमेंट व्ह्यू
कुण्या एकाने पाठवलेला तो एक मेल शोधताय? किंवा दोन आठवड्यांपूर्वीच्या पार्टीचा फोटो हवाय? चिंता नसावी. सगळं काही आहे इथे. तुमचे फोटो आणि अटॅचमेंट्स सुटसुटीतपणे पाहा. आणि एकाचवेळी एकापेक्षा जास्त अटॅचमेंट्स तुम्ही पाठवूसुद्धा शकता.

कस्टमायझेशन
तुमचा इनबॉक्स, तुमच्याचसारखा. तुम्हाला हवे असलेले फोल्डर्स आणि आवडीचा व्ह्यू तुम्ही बॉटम नेव्हिगेशन बार कस्टमाइझ करून आणू शकता. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असा चटपटीत आणि आकर्षक इनबॉक्स कस्टमाइज करा.

साउंड्स + नोटिफिकेशन्स
इमेल नोटिफिकेशन्स, कस्टम साउंड अलर्ट्स आणि व्हिज्युअल सेटिंगच्या एकानेक पर्यायांमधून तुमच्या आवडीनुसार पर्याय निवडा.

ॲक्सेसिबिलिटी
उच्च कॉण्ट्रास्ट थीम्स, डायनॅमिक टेक्स्ट रिसायजिंग आणि TalkBack स्क्रीन रीडरसह ऑप्टिमाइज केलेली वैशिष्ट्ये. याशिवाय इनबॉक्सच्या तळाशी असलेले फोल्डर्स, सहाय्यक तंत्रज्ञान वापरकर्त्यांना विनासायास त्यांचे इमेल नेव्हिगेट करण्याची अनुमती देतात.

१००० जीबी स्टोरेज
डबक्यात राहून समुद्रात पोहण्याचा अनुभव नाही घेता येत. इमेल मॅनेजमेंट ॲप डाउनलोड करा आणि इमेल स्टोअरेजविषयी निर्धास्त राहा.

टिपा:
- TalkBack सोबत वापरण्यासाठी ऑप्टिमाइझ केले आहे.
- कृपया Yahoo Mail Go ॲप इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी Yahoo Mail ॲप अनइन्स्टॉल करा.

अभिप्राय द्यायचाय? आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
[email protected]

सेवेसाठीच्या अटी
https://policies.yahoo.com/us/en/yahoo/terms/product-atos/comms-mailadfree/index.htm

गोपनीयता धोरण: https://policies.yahoo.com/us/en/yahoo/privacy/products/mail/index.htm
या रोजी अपडेट केले
१५ नोव्हें, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 8
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.६
१५.७ ह परीक्षणे

नवीन काय आहे

या नवीन रिलीजमध्ये आहे पूर्णतः अद्ययावत डिझाइन व अनेक नवीन वैशिष्ट्ये.

• नवीन नेव्हिगेशन : तुमचे फोल्डर्स अॅक्सेस करण्यासाठी व पाहण्यासाठी तळाशी आहे जॉय बार, जो तुम्ही तुमच्या गरजांनुसार कस्टमाइझ करू शकता.
• फोल्डर्स : पाठवलेले, ड्राफ्ट्स, ट्रॅश, स्पॅम व इतर फोल्डर्स पाहण्यासाठी खाली नेव्हिगेशनमधील “इनबॉक्स” टॅबवर टॅप करा.
• लिहा व शोधा ला उजवीकडे वर नेण्यात आलं आहे
• खात्याची माहिती : इमेलची खाती जोडण्यासाठी, हाताळण्यासाठी किंवा अदलाबदल करण्यासाठी डावीकडे वर तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.